भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

आजचा लेख भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 

नमस्कार माझ्या बांधवानो, आपल्या ह्या हक्काच्या वेबसाईटवर आपण विविध योजना पोस्ट करत असतो.  ह्या वेबसाईटवर तुम्हाला शैक्षणिक योजना, कृषी योजना व सरकारी योजनाबद्दलची माहिती मिळेल.

आम हि वेबसाईट बनवण्या मागचा उद्देश एकच कि प्रत्येक योजना हि अंतिम लाभार्थ्यापर्यंत पोहचावी आणि योजनेचा लाभ घेवून लाभार्थ्याने स्वतःची आर्थिक प्रगती करावी.

आम्ही तुम्हाला ह्या वेबसाईटवर योजेनेची माहिती व लागणारे आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्ज कसा करायचा ह्या सर्व गोष्टींची सखोल माहिती देण्याचा पुरेपूर प्रयतन करू. सर्व लाभार्त्याची प्रगती व्हावी हीच सदिच्छा.

आज आपण योजना बघणार आहोत ती योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | Bhausaheb Fundkar Falbag Lagvad होय. सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामधून जाणून घेऊ.

थोडक्यात माहिती Short information about scheme

योजनेच नाव भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
उद्देश काय आहेराज्यातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकर्यांना फळ पिकानसाठी अनुदान देणे
योजना कोणी सुरु केलीमहाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली आहे
लाभार्थी कोणमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी

Bhausaheb Fundkar Falbag Lagvad in marathi

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाची प्रस्तावना :

1990 पासून राज्यात फळबाग लागवडीचा कार्यक्रम रोजगार हमी योजनेशी जोडण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत आर्थिक मदत हळूहळू बंद करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत, लहान आणि सीमांत जमीनधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकरी, दोन हेक्टरपर्यंत जमिनीची लागवड करण्यासाठी अनुदानास पात्र आहेत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे आणि फळबागा आणि पशुधनाच्या स्थापनेद्वारे अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे हे आहे. फळांच्या लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनांवर काही नकारात्मक परिणाम झाला असला तर, या योजनेमुळे हवामानातील बदल आणि हंगामी बदलांशी संबंधित समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

* लाभार्थी होण्यासाठी पात्रता –  

  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या कार्यक्रमाचे फायदे वैयक्तिक शेतकऱ्यांना देखील उपलब्ध आहेत. त्याचा लाभ संस्थात्मक लाभार्थ्यांना मिळत नाही.
  • शेतकऱ्याच्या नावावर 7/12 असणे आवश्यक आहे. फळबाग लागवडीसाठी, लाभार्थी 7/12 स्लिपवर संयुक्त खातेदार म्हणून सूचीबद्ध असल्यास प्रत्येक खातेदाराचे संमती पत्र आवश्यक आहे.
  • 7/12 स्लिपवर कुटुंबाचे नाव दिसल्यास कुटुंबाने योजनेसाठी संमतीपत्र देणे आवश्यक आहे.
    • ज्या शेतकऱ्यांची कुटुंबे त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत त्यांना सर्व श्रेणींमध्ये प्राधान्य दिले जाईल, त्यानंतर इतर शेतकऱ्यांना विचारात घेतले जाईल. पती, पत्नी आणि कोणतीही अल्पवयीन मुले हे कुटुंब मानले जाते.
    • पात्र लाभार्थींमधून लाभार्थी निवडताना अनुसूचित जाती/जमाती आणि अल्प व अत्यल्प भूधारकांना प्राधान्य दिले पाहिजे.
  • अपंग लोक आणि महिला.
  • पट्टेदार शेतकरी पारंपारिक वननिवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 नुसार योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र असतील.

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी  क्षेत्र मर्यादा –

  • कोकण विभागासाठी – किमान 0.10 हेक्टर ते कमाल 10.00 हेक्टर
  • उर्वरित विभागासाठी – किमान 0.20 हेक्टर ते कमाल 6.00 हेक्टर क्षेत्र मर्यादा राहील.
  • शेतकरी बांधव हा त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळ पिके लावू शकतो.
  •  संयुक्त खातेदार असल्यास, सुंयक्त खात्यावरील त्याच्या नावे असलेल्या क्षेत्राकरीता लाभ देण्यात यावा.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याजनेमध्येपात्र असणाऱया शेतकऱयांना या (MREGS) योजनेच २ हेक्टर क्षेत्रापयंत लाभ घेतल्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमूधन लाभ घेता येईल.
  •  लाभर्त्याने फळबाग लागवड वा अन्य योजनेअंतरंगत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मयादेपयंत लाभार्थी पात्र राहील.

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील अन्य बाबी –

  • शेतकर्याने स्वखर्चाने करायचे कामे व शासन अनुदानीत कामे पुढीलप्रमाणे –
  • शेतकर्याने स्वखर्चाने करायचे कामे
  • माती व शेणखत / सेंद्रिय खत मिश्रणाने खड्डे भरणे
  • जनमन तयार करणे
  • आंतर मशागत करणे
  • रासायननक खत वापरुन खड्डे भरण
  • काटेरी झाडाचे कूपन करणे (ऐच्छिक)
  • शासन अनुदानीत कामे
  • खड्डेखोदणे
  • कलमेलागवड करणे
  • पीक संरक्षण.
  • नांग्या भरणे.
  • ठिबक सिंचानेद्वारे पाणी देणे

*भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड  ह्या योजनेत सामाविष्ट करण्यात आलेली पिके पुढील प्रमाणे –

.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

अ.क्र.फळपीकशिफारस वाणजिल्हे विभाग
आंबाकेशर,दशेहरी, रत्ना, पायरी, लंगडा, नागीनविदर्भा सर्व जिल्हे
काजूवेंगूला – ४नागपूर,गोंदिया, भंडारा,दचंद्रपूर, गडचीरोली
पेरूसरदार (एल-४९), श्वेता, ललितविदर्भा सर्व जिल्हे
डाळींबभगवा, भगवा सुपर व आरक्तावाशीम, बुलढाणा
संत्रानागपूर सुंत्रा, नागपूर सीडलेस, नागपूर संत्रा नंबर ५नागपूर, वधा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा
मोसंबीकाटोल गोल्ड, न्यूसेलरनागपूर, वधा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा
कागदी लिंबूपीडीके व्ही लाईम, पीडीकेव्ही बहारविदर्भा सर्व जिल्हे
सीताफळबाळानगरविदर्भा सर्व जिल्हे
आवळाएन-ए-7, एन-ए-10, कांचन, कृष्णाविदर्भा सर्व जिल्हे
१०चिंचअकोला स्त्मृती, नंबर २६३विदर्भा सर्व जिल्हे
११जांभूळबहाडोली, स्थानिक जातीची कलमविदर्भा सर्व जिल्हे
१२फणसकोकण प्रॉलीफिकविदर्भा सर्व जिल्हे
१३अंजीरपुना फिग, दिनकरनागपूर, वधा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा
१४चिकूकालीपत्ती, क्रिकेट बॉलविदर्भा सर्व जिल्हे

. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी

अ.क्र.फळपीकशिफारस वाणजिल्हे विभाग
आंबाकेशर, रत्ना, हापूस, सिंधू, पायरी, लंगडा, वनराज,तोतापूरी, साई-सुगंध, सुवर्णा , फुले अभिरुची(लोणच्याच्या कै-यांसाठी )पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
पेरूसरदारपश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
डाळींबगणेश, जी- १३७, मृदूला, फुले आरक्ता, भगवा, फुले भगवा सुपर, फुले अनारदानापश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
मोसंबीमोसंबी, फुले मोसंबीपश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
कागदी लिंबूफुले शरबती, साई शरबतीपश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
सीताफळबाळानगर फुले जानकी, फुले पुरंदरपश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
आवळाकांचन, कृष्णा, नीलम, चकेयापश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
चिंचअकोला स्त्मृती, नंबर २६३पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
नारळबाणावली, प्रताप, टी X डी, डी X टीपश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
१०जांभूळकोकण बहाडोली, स्थानिक जातीची कलमपश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
११अंजीरपुना फिग, दिनकर, फुले राजेवाडीपश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
१२चिकूकालीपत्ती, क्रिकेट बॉलपश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
१३काजूवेंगूला – ४, ६, ७, ८ व ९कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, आणि नाशिक या जिल्ह्यातील पश्चिम घाटातील तालुके

३. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

अ.क्र.फळपीकशिफारस वाणजिल्हे विभाग
आंबापरभणी भूषण, निरंजन, केशर, दशेहरीमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
पेरूसरदार, ललितमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
डाळींबगणेश, भगवा, सुपर भगवामराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
मोसंबीन्यूसेलर, सातगुडीमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
कागदी लिंबूविक्रम, प्रमालीनी, साई शरबतीमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
सीताफळताड पिपळळगाव-७, धारुर-६, बाळानगरमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
आवळाएन-ए-७, एन-ए-१० कांचन, कृष्णा,  चकेयामराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
चिंच२६३ नं., योगेश्वरी, अजिंठा, शिवाईमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
जांभूळकोकण बहाडोलीमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
१०अंजीरदिनकर, पुना फीग, बँगलोरमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
११चिकूकालीपत्ती, क्रिकेट बॉलमराठवाडा विभागातील सर्व जिल्हे
१२संत्रानागपूर संत्रा, नागपूरी सिडलेस, नागपूर संत्रा क्र. ५मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे

. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

अ.क्र.फळपीकशिफारस वाणजिल्हे विभाग
आंबाकेशर, रत्ना, हापूस, सिंधू ,कोकण राजा (सलाड) कोकण रुची (लोणचे) ऑस्टीन आणि लिली (परदेशी )मुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
काजूवेंगूला – ४, ६, ७, ८ व ९मुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
पेरूसरदार (एल-४९), ललितमुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
नारळबाणावली, प्रताप, टीXडी , ऑरेंज डॉफ, डी X टीमुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
कोकमकोकण अमृता, कोकण ह्तीसमुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
आवळाअनित, बळवंत, कांचन , कृष्णा , एन-ए-६मुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
जांभूळकोकण बहाडोलीमुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
फणसकोकण प्रोलीफिकमुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
चिकूकालीपत्ती, क्रिकेट बॉलमुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग
१०लिंबूकोकण लिंबूमुंबई व मुंबई उपनगर (शहरी भाग) वगळता इतर जिल्हे  (ठाणे, पालघर, रायगड, रत्नानगरी व सिंधुदुर्ग

त्तर आपण आज भाऊ साहेब फुंडकर योजने बद्दल योग्य ती माहित जाणून घेतली आहे अश्या अजून अनेक योजना आम्ही लाक्कारच घेवू येणार आहोत.